नवीन क्रुषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य आणि अधिक मोबदला मिळणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन क्रुषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य आणि अधिक मोबदला मिळणार आहे. तेंव्हा हिंमत असेल तर हे कायदे परतवून दाखवावेत, असं आव्हान भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं आहे. सांगली जिल्ह्यात किसान आत्मनिर्भर यात्रा उद्घाटन प्रसंगी बोलत होते.यात्रेचा पहिलाटप्पा चार दिवस चालणार आहे.

भारतीय किसान मोर्चा आणि रयत क्रांती संघटना यांच्यातर्फे सदर  यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.मराठा समाजातल्या तरुणांना आर्थिक दुर्बल घटकांसाठीची सवलत देणं, हे राज्य सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे, हा निर्णय उशिरा घेतल्याने शालेय विद्यार्थ्यांचं एका वर्षाच्या शैक्षणिक सवलतींचे नुकसान झालं. असंही ते म्हणाले.

आरोप शेलार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.यावेळी सदाभाऊ खोत, आणि गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते.