नेक्स्ट एज्युकेशनचे स्मार्ट लर्निंग अ‍ॅप 'लर्ननेक्स्ट+'

  


मुंबई: प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वंकष सेल्फ-लर्निंग अनुभव सुलभ करण्याकरिता, भारतातील अग्रेसर स्मार्ट लर्निंग सोल्युशन प्रदाता, नेक्स्ट एज्युकेशन प्रा.लि. ने नुकतेच लर्ननेक्स्ट+ हे नवे फीचर आणले आहे. के-१२ विद्यार्थ्यांसाठी सहज उपलब्ध होणारा साथीदार असे लर्ननेक्स्ट+ हे स्मार्ट लर्निंग अॅप हे विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्कृष्टता मिळवण्याकरिता तसेच सर्व विषयांमध्ये भक्कम वैचारिक पाया विकसित करण्यात मदत करते.

या पुरस्कारप्राप्त कोर्सचा कंटेंट हा नेक्स्ट एज्युकेशनच्या तज्ञांनी संशोधन करून तयार केलेला आहे. २० पेक्षा जास्त विषयांचे शिक्षण पुरवणारे लर्ननेक्स्ट+ हे २००० पेक्षा जास्त तासांचे संवादात्मक आणि आकर्षक एचडी व्हिडिओ लेसन्स तसेच संपूर्ण सराव चाचण्या पुरवते. हे सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून कोठूनही त्यावर प्रवेश घेतला जाऊ शकतता. याद्वारे शिक्षण अधिक लवचिक होते.

यासोबतच, स्मार्ट लर्निंग अॅप हे एनसीएफ (नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क) आणि सीसीई (कंटिन्युअस अँड कॉम्प्रहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन) यांच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने अॅक्टिव्हिटी आधारित अभ्यासक्रमाचे अनुसरण करते. यात ६०० पेक्षा जास्त सिम्युलेशन्स आणि विज्ञानातील महत्त्वाच्या संकल्पनांसह एकत्रित अनुभव असून याद्वारे शिक्षणाला चालना मिळते. तसेच विविध विषयांबाबत अधिक स्पष्टपणा येतो.

नेक्स्ट एज्युकेशनचे संस्थापक आणि सीईओ ब्यास देव रल्हन म्हणाले, “केवळ पुस्तकातून घेतलेले शिक्षण, प्रत्येक विद्यार्थ्यांची शिकण्याची गरज भागवू शकत नाही. कारण, पाठ्यपुस्तकांमध्ये प्रामुख्याने अभ्यासक्रमावर आधारीत घटकांवर भर दिला जातो. सध्याच्या स्पर्धात्मक जगात इतरांपुढे राहण्यासाठी, विद्यार्थ्यांना विविध संकल्पना व त्यांचे कार्य स्पष्टपणे माहिती असणे गरजेचे आहे. लर्ननेक्स्ट+ हे विद्यार्थ्यांना हीच पद्धत पुरवते. यात संकल्पना स्पष्ट करत शिकण्या-शिकवण्याच्या पद्धतीचा आनंद यातून दिला जातो.”