शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात रक्तदान शिबीर, फळवाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात शेकडो तरुणांनी रक्तदान केले.

वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये जिल्हाभरातून शेकडो तरुणांनी रक्तदान केले.

राज्याचे पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचाही आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज युवक काँग्रेसच्या वतीने गडचिरोली इथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ९० जणांनी रक्तदान केले. 

पवार यांच्या ८० व्या वाढदिवासाचे औचित्य साधून, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने दिव्यांग जनांना आवश्यक उपकरण पुरवण्यासाठी महाशरद डिजिटल प्लॅटफॉर्म हे पोर्टल सुरु केले आहे. त्याच अॅप येत्या मार्चपर्यंत प्ले स्टोरवर उपलब्ध होईल.

अशा उपकरणाची गरज असणारे आणि अपगांना अशी उपकरण मोफत देऊ इच्छणाऱ्या व्यक्ती, संघटना, खाजगी कंपन्या यांच्यासाठी ही व्यवस्था उपयुक्त ठरणार आहे.