भारतीय सैन्यातर्फे आणि जिल्हा पोलीस दलातर्फे हुतात्मा कैलास दहिकर यांना मानवंदना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचलात कर्तव्यावर असताना हुतात्मा झालेल्या मेळघाटातील कैलास दहिकर यांना काल हजारो उपस्थितीत भावपूर्ण निरोप देण्यात आला.

भारतीय सैन्यातर्फे आणि जिल्हा पोलीस दलातर्फे यावेळी हुतात्मा दहिकर यांना मानवंदना देण्यात आली. पोलीस दलातर्फे तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तसंच अमरावती जिल्ह्याच्या संपर्कमंत्री यशोमती ठाकूर,शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, खासदार नवनीत राणा, आमदार राजकुमार पटेल, यांनी पुष्पचक्र वाहून हुतात्मा कैलास दहिकर यांना श्रद्धांजली वाहिली.