सीबीएसईच्या आगामी परिक्षांच्या तारखा ३१ डिसेंबरला जाहीर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आगामी परिक्षांच्या तारखा येत्या ३१ डिसेंबरला जाहीर होणार आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज ट्विटरवर ही माहिती दिली.

‘सीबीएसई’ची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात होतात आणि तारखा नोव्हेंबर महिन्यात जाहीर होतात. मात्र यंदा कोरोनामुळे या तारखा अद्याप जाहीर झाल्या नाहीत.