देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ६५ शतांश टक्क्यावर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ६५ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल ३० हजार ३७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. देशात आतापर्यंत ९६ लाख ३६ हजार ४८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या २ लाख ९२ हजार ५१८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

देशभरात काल १९ हजार ५५६ नवीन कोरोनाबाधित आढळले, तर ३०१ रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या १ कोटी ७५ हजार ११६ इतकी झाली आहे. देशात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत १ लाख ४६ हजार १११ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदर १ पूर्णांक ४५ शतांश टक्के आहे.

काल दहा लाख ७२ हजार २२८ कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशभरात आतापर्यंत १६ कोटी ३१ लाख ७० हजार ५५७ चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.