ग्रामस्थांच्या श्रमदानामळे नाशिक जिल्ह्याच्या म्हैसमाळ गावातील पाणी टंचाई दूर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातलं म्हैसमाळ हे गाव पाणी टंचाईनं अत्यंत ग्रासलेलं होतं, त्यामुळे पाणी आणण्यासाठी महिलांना भ्रमंती करावी लागत होती.

नाशिकच्या सोशल नेटवर्किंग फोरम या समाज माध्यमातून विधायक कामासाठी एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांच्या संस्थेनं स्थानिक ग्रामस्थांच्या श्रमदानातून याच गावाजवळच्या एका धरणातून चर खोदून पाणी गावात आणलं. 

त्यामुळे पाण्याअभावी अनेक संकटामुळे चर्चेत असलेलं हे गाव आता गावात पाणी आल्यामुळे चर्चेत आलं आहे. सामाजिक माध्यमाद्वारे एकत्र आलेल्या सेवाभावी कार्यकर्त्यांनी या गावाचा पाणी प्रश्न सोडवला, तसंच या संस्थेनं आत्तापर्यंत १८ गावांमध्ये अशाप्रकारे पाणी आणून त्यांचा पाणीप्रश्न सोडवला असल्याचं संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी सांगितलं.