हिंसामुक्त वातावरण असेल तरच सार्कचा गट त्याच्या मूळ क्षमतेने कार्य करू शकेल - नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादमुक्त आणि हिंसामुक्त वातावरण असेल तरच दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना अर्थात सार्कचा गट त्याच्या मूळ क्षमतेने कार्य करू शकेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्यांविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज आहे; असे मोदी यांनी सार्क घटना दिनाच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटले आहे.

कोविड-१९ च्या जागतिक साथीमुळे झालेली हानी भरून काढण्यासाठी अन्य देशांबरोबर काम करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे असेही मोदी यांनी या संदेशात नमूद केले आहे.