एंड-यूझर डाटा प्रायव्हसीबाबत भारतातील सर्वात मोठे व पहिले वर्तणुकविषयक संशोधन
• महेश आनंदा लोंढे
मुंबई: वर्तणूक विज्ञान तज्ञ, द सेंटर फॉर सोशल अँड बिहेविअरल चेंज (सीएसबीसी), अशोका युनिव्हर्सिटी अँड बुसारा सेंटर फॉर बिहेविअरल इकोनॉमिक्स यांनी ओमिदयार नेटवर्क इंडिया-इनव्हेस्टमेंट फर्मच्या सहकार्याने सामाजिक प्रभावावर भर देत, भारत आणि केन्यामधील पहिलाच वर्तणुकविषयक माहिती घेणारा प्रयोग पूर्ण केला आहे. एंड-यूझर्सला गोपनीयतेबद्दल अधिक सतर्क केले जाऊ शकते का आणि अधिक चांगली गोपनीय पद्धतींमुळे व्यवसायांना फायदा होतो का या प्रश्नांची उत्तरे या प्रयोगाद्वारे शोधली गेली.
यूझर्समध्ये अस्तित्वात असलेल्या विरोधासावर या प्रयोगांद्वारे प्रकाश टाकण्यात आला. यूझर्सना त्यांच्या प्रायव्हसीबाबत सुरक्षितता हवी असते, मात्र त्यांच्या कृतीतून ते दिसत नाही. बुसारा आणि सीएसबीसी यांच्या मते, ग्लोबल साउथमधील डाटा प्रायव्हसी प्रॅक्टिस सुधारण्याकरिता अशा स्थितीत यूझरचे वर्तन समजून घेणे आवश्यक आहे.
यूझर्सचे प्रायव्हसीसंबंधी वर्तन प्रभावित करण्यासाठी या प्रयोगात विविध गोष्टी करण्यात आल्या. जसे की, प्रायव्हसी पॉलिसी अधिक व्हिज्युअल पद्धतीने सादर करणे, ठराविक काळापर्यंत यूझर्सला पॉलिसी पेजवर टिकवून ठेवणे, बिझनेसकडून ज्या प्रायव्हसी पॉलिसीचा वापर होतो, त्यांच्या क्वलिटी दर्शवण्यासाठी स्टार रेटिंग देणे इत्यादी.
अशोका विद्यापीठातील, द सेंटर फॉर सोशल अँड बिहेविअर चेंजच्या वरिष्ठ सल्लागार पूजा हलडीया म्हणाल्या, “आम्ही केलेल्या प्रयोगाचे खूप चांगले परिणाम दिसून आले. संमती प्रक्रिया सुधारण्यासाठी अनेक गोष्टी लक्षात आल्या. स्वत:साठी योग्य पर्याय निवडण्याची क्षमता नेहमीच लोकांकडे असते असे नाही. तसेच व्यवसायांसमोरील उद्दिष्ट नेहमीच प्रायव्हसीला प्राधान्य देण्याचे नसते. डाटा प्रायव्हसी प्रक्रियेत अर्थपूर्ण बदल केल्याने प्लॅटफॉर्मच्या डिझाइनमध्ये आणखी चांगले नियम आणि प्रायव्हसी सुविधा देता येतील. वास्तविक बाजारपेठेत या मुद्द्यांची तपासणी करत, सेवा प्रदाते आणि पॉलिसीमेकर्ससोबत काम केल्यांतर देशातील प्रायव्हसी प्रक्रिया सुधारण्यासाठी अधिक मदत होईल.”
ओमिदयार नेटवर्क इंडियामधील पार्टनर शिल्पा कुमार म्हणाल्या, “ऑन इंडियाच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक म्हणजे प्रत्येक भारतीयाला ऑनलाइन असताना, तंत्रज्ञानाचा लाभ घेताना आपण सक्षम आणि सुरक्षित असल्यासारखे वाटणे. तसेच यातील जोखीमींमुळे त्या व्यक्तीला कमीत कमी धोका होणे. या उद्दिष्टाच्या दिशेने, आम्ही डेटा आणि काळजी घेणाऱ्या अर्थव्यवस्थेतील लाभ व जोखीम स्वीकारणाऱ्या प्रयत्नांना साथ देतो तसेच प्रत्येक व्यक्तीला ऑनलाइन धोक्यांपासून बचावाकरिता काही कृती करण्यास सक्षम करतो. बदलत्या जागतिक नियमांच्या अनुषंगाने, इनटॅक्ट मोहिमेद्वारे हे सूचित केले जाते की, प्रत्येक व्यक्तीला धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सेवा प्रदात्याची असते. हे नियम, अन्न सुरक्षा आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांसारख्या ग्राहकहिताच्या क्षेत्रांशी सुसंगत आहेत. प्रायव्हसीला व्यावसायिकतेची जोड आहे, हेही यातून सूचित होते. सेवा प्रदाते जबाबदारीने वापर करतील, असा विश्वास असल्यास ग्राहक अधिकाधिक डेटा शेअर करतील.”
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.