कोयना येथील रिसॉर्ट सुरू ; पर्यटकांनी आनंद घ्यावा असं एमटीडीसीचे आवाहनमुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना टाळेबंदी टप्प्याटप्प्यानं शिथिल होत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आता कोयना येथील पर्यटक निवास सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वीच एमटीडीसीनं पुणे विभागातील महाबळेश्वर, माथेरान, कार्ला, पानशेत, भिमाशंकर, माळशेज घाट इथली रिसॉर्ट सुरू केली आहेत. डिसेंबरमध्ये कोयना येथील रिसॉर्ट सुरू होत असून, पर्यटकांनीही पर्यटनाचा आनंद घ्यावा असं आवाहन एमटीडीसीने केले आहे.महामंडळाच्या सर्वच रिसार्टमध्ये कोरोनाबाबत योग्य ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. संपुर्ण रिसॉटचे र्सॅनिटायझेशन, मास्क,


सोशल डिस्टंन्सिंग, सॅनिटायझर स्प्रे, शरीराचे तापमान मोजण्याची यंत्रणा, ऑक्सीमीटर तसेच अत्यावश्यक मेडीकल सुविधेसाठी जवळच्या डॉक्टरांशी संपर्काची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
Image
कर्ज घेऊन व्यवसाय यशस्वी करणाऱ्या तरुणांची कोरोना संकटग्रस्तांना मदत
Image
पंतप्रधानांनी ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या भागातील भारतीय नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद
अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्तपदांसाठी लवकरच पदभरती - अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे
Image