सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक टी.एन.कृष्णन यांचं काल रात्री चेन्नई इथं निधन


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक टी.एन.कृष्णन यांचं काल रात्री चेन्नई इथं निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. चेन्नईच्या संगीत महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं, त्यानंतर ते दिल्ली विद्यापीठात स्कूल ऑफ म्युझिक अॅन्ड फाइन ऑर्टसचे संचालक बनले. त्यांना पद्म पुरस्कारासह, पद्मभूषण, संगीत अकादमीचा संगीत कलानिधी, यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यकैय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे.