राज्यभरातल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच करणार जाहीर


 

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यभरातल्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कोविडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता नव्यानं जाहीर केला जाणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज घोषणा केली.

ते पुढे म्हणाले १९ जिल्ह्यातल्या या निवडणूकांसाठी २४ फेब्रुवारी २०२० ला कार्यक्रम जाहीर केला होता, पण टाळेबंदीमुळे हा कार्यक्रम रद्द केला गेला. तसंच सुधारित मतदार यादी २५ सप्टेबर रोजी जाहीर करण्यात आली.

त्यामुळे नव्यानं नाव नोदवल्या गेलेल्या मतदरांना मतदान करता यावं तसंच निवडणूक लढवता यावी म्हणून लवकरचं ही यादी जाहीर केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.