राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या काही नावांविरोधात याचिका दाखल


 

मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारनं शिफारस केलेल्या काही नावांवर आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.

  वरिष्ठ सभागृहाला वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा मिळावा, सामाजिक सेवा, विज्ञान, कला, साहित्य, आदी क्षेत्रांतलं विशेष ज्ञान तसंच अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपालांमार्फत नियुक्ती करण्याची तरतूद घटनेत आहे.

  मात्र, या तरतुदीला बगल देत राजकीय पार्श्वभूमी असलेले एकनाथ खडसे, राजू शेट्टी, रजनी पाटील, सचिन सावंत आदींच्या नावांची शिफारस मुख्यमंत्र्यांनी केली, असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे. यावर येत्या २४ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. सदर व्यक्तींना याचिकेत प्रतिवादी करण्याची परवानगी याचिकाकर्त्यांना देण्यात आली आहे.

Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
पंतप्रधानांनी ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या भागातील भारतीय नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद
कॅटरिंग ब्रँड फीस्टलीचा मुंबईत प्रवेश
Image