ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांचे दीर्घ आजारामुळे निधन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ रंगकर्मी, राम जाधव यांचे आज दीर्घ आजारामुळे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. जाधव यांनी अभिनय सोबतच, दिग्दर्शन, निर्माता म्हणून देखील आपली छाप पाडली. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्यशासनासह विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरवले.

२०११ मध्ये रत्नागिरी येथे भरलेल्या ९१व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद राम जाधव यांनी भूषवले होते.

त्यांच्या निधनाने नाट्य क्षेत्राचा चालता, बोलता विश्वकोष हरवला असून मागील ५ दशकापासून अकोल्याची नाट्य चळवळ प्रभावित ठेवणाऱ्या या जातीवंत कलावंताने जीवनाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली असल्याची भावना अकोला इथे व्यक्त होत आहे.