लोकहिताच्या सर्व योजना तंत्रज्ञानामुळे वेगानं लोकांपर्यंत पोचवणं शक्य झाल्याचं प्रधामंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहितीतंत्रज्ञानाच्या युगामध्ये भारत मोठी उडी घेण्यासाठी सिद्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बंगळुरु इथे होत असलेल्या तंत्रज्ञान विषयक परिषदेचं आज प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते.

भारतात तयार होणाऱ्या तांत्रिक सुविधा आता जगभरात उपलब्ध करुन द्यायला हव्यात असं ते म्हणाले. गेल्या महिन्याभरात आर्थिक देवघेवीसाठी २ अब्ज वेळा तर राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन, स्वामीत्व योजना यासाठी अनेकदा तंत्रज्ञान सुविधेचा वापर देशात झाला असून तंत्रज्ञानामुळे लोकोपयोगी योजना झपाट्यानं पोहचू शकतात असंही प्रधानमंत्री म्हणाले. 

आजपासून सुरु झालेली ही परिषद तीन दिवस चालणार असून त्यात ४ हजार प्रतिनिधी सहभागी होत आहेत. २५ देशातले नामवंत तंत्रज्ञ, गुंतवणूकदार, संशोधक या परिषदेला उपस्थिती आहेत.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image