अभिनेते मोहन जोशी यांना यशवंत वेणू पुरस्कार जाहीर


 

मुंबई (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे यशवंत वेणू पुरस्कार यंदा अभिनेते मोहन जोशी आणि त्यांच्या पत्नी ज्योती जोशी यांना जाहीर झाला आहे.

कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी आज पुण्यात ही माहिती दिली.

५ हजार रुपये, मानपत्र, पुणेरी पगडी आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कार वितरण २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे .