भारतीय जवान कुलदीप जाधव यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू


 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सैन्यदलाच्या सेवेत असलेले नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यातले कुलदीप जाधव यांचा काल कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. जाधव हे जम्मू काश्मीरमेधे राजौरी भागात कार्यरत होते. या भागातल्या थंडीमुळे झोपेतच जाधव यांचा मृत्यु झाला अशी माहिती सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली.

जाधव दांपत्याला नुकताच मुलगा झाला. मुलाला पाहण्यासाठी ते रजेवर पिंगळवाडी या आपल्या मुळ गावी येणार होते. पण त्याआधीच त्यांच्या निधन झालं. आज रात्री उशीरा त्यांचं पार्थिव आधी मुंबईत आणि त्यानंतर त्यांच्या मुळगावी आणलं जाईल. तिथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती सटाणा पोलीसांनी दिली आहे.