देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९२, तर राज्याचा दर ९० टक्क्याच्या वरनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर 92 टक्क्यावर पोहोचला असून काल 58 हजारापेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.देशात आतापर्यंत 76 लाखापेक्षा जास्त कोरोनाचे  रुग्ण बरे झाले असून सध्या उपचार घेत असलेला रुग्णाचं प्रमाण आतापर्यंत नोंद झालेल्या एकूण रुग्णसंख्येच्या केवळ 6 पूर्णांक 55 शतांश टक्के इतकी असल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे.


काल देशात कोरोनाच्या 38 हजार  310 नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या 82 लाखापेक्षा जास्त झाली आहे.चाचणी-तपास-उपचार या त्रिसूत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे, रुग्ण बरे होणाचं प्रमाण वाढलं असून मृत्यूचं प्रमाण कमी झाल्याचं यात म्हटलं आहे.