वीज कर्मचाऱ्यांना यंदाही गेल्या वर्षाइतकाच बोनस मिळणार


मुंबई (वृत्तसंस्था) : वीज कर्मचाऱ्यांना यंदाही गेल्या वर्षाइतकाच बोनस मिळणार आहे. ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी ही घोषणा केली आहे. गेल्या वर्षी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये बोनस मिळाला होता, तर विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक यांना प्रत्येकी 9 हजार रुपये बोनस मिळाला होता.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोनस निळेल की नाही याबाबत निश्चिती नसल्यानं ओन दिवाळीत वीज कर्मचारी संपाचं हत्यार उपसण्याची भीती होती. मात्र आता ता टळल्यानं दिवाळीत नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.