माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांचं ‘माझी भिंत’ हे पुस्तक प्रकाशित


मुंबई (वृत्तसंस्था) : माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या फेसबूक पेजवरच्या नोंदी, निरीक्षणं, स्फुट लेख आणि अभिप्राय यांचं संकलन असलेल्या ‘माझी भिंत’ या पुस्तकाचं प्रकाशन काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन इथं झालं.

कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, लेखक राजेंद्र दर्डा व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी लोकमतच्या दिवाळी विशेषांकांचे प्रकाशनहा राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं.