इयत्ता अकरावीच्या तीनही शाखांचे वर्ग आजपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू


मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता अकरावीच्या तीनही शाखांचे वर्ग आजपासून  ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याचा राज्या सरकारनं निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्वीटर संदेशात ही माहिती दिली. 

  कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक या विद्यार्थ्यांना शिकवतील. ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश मिळाला नसेल ते देखील नोंदणी करून या वर्गात बसू शकतात. या वर्गांच्या वेळा विद्यार्थ्यांना ई-मेल किंवा एसएमएस च्या माध्यामातून कळवल्या जातील.

  राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे. तीन पाळ्यांमधे हे वर्ग चालवले जाणार आहेत. दरदिवशी विविध महाविद्यालयातल्या ५० नोंदणीकृत विद्यार्थ्यांना झूम ऍपच्या माध्यमातून शिक्षण दिलं जाईल.


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image