आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत मुंबई इंडियन्स अंतिम फेरीत दाखल


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेत काल झालेल्या पहिल्या पात्रता फेरीत मुंबई इंडियन्स संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा 57 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. कालच्या सामन्यात पराभव झाला असला तरी दिल्लीच्या संघाला आणखी एक संधी मिळणार आहे.

रॉयल चॅलेन्जर बंगळूरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज बाद फेरीचा सामना होणार असून त्यातल्या विजेत्यांबरोबर दिल्लीची लढत होईल.