आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्यापासून अंतिम फेरीचे सामने


नवी दिल्ली (वृत्तसंस्था):आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्स संघाचा १० गडी राखून सहज पराभव केला आणि प्ले ऑफ फेरीत प्रवेश केला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या संघाने १४९ धावांचे आव्हान उभे केले. मात्र, हैदराबादचे आघाडीवीर डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धीमान साहा यांनी नाबाद अर्धशतक झळकवताना संघाला १७ चेंडू बाकी असतानाच विजय मिळवून दिला.

आता पहिल्या पात्रता फेरीत उद्या मुंबई इंडियन्स संघाचा सामना दिल्ली कॅपिटल्सबरोबर होईल. यांच्यातील विजेता अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर, शुक्रवारी होणाऱ्या बाद फेरीत हैदराबादचा सामना रॉयल चॅलेंजर बंगळूर संघाबरोबर होईल. यातील विजेत्याचा सामना पात्रता फेरीत पराभूत झालेल्या संघाबरोबर होईल.

स्पर्धेतील अंतिम सामना १० नोव्हेंबरला होणार आहे.