संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते बेस्ट कमांड रुग्णालयासाठी संरक्षण मंत्री करंडक प्रदान


नवी दिल्‍ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट आणि दुसऱ्या क्रमांकाच्या एएफएमसी कमांड रुग्णालयासाठी 2019 साठीचा संरक्षण मंत्री करंडक प्रदान करण्यात आला. कमांड रुग्णालय (हवाई दल) बेंगळुरुला सर्वोत्कृष्ट आणि कमांड रुग्णालय (ईस्टर्न कमांड) कोलकाता दुसऱ्या क्रमांकाचे उत्कृष्ट रुग्णालय ठरले.  


दोन्ही रुग्णालयांच्या उत्कृष्ट कामगिरीची प्रशंसा करताना संरक्षण मंत्र्यांनी एएफएमसीच्या उत्कृष्ट सेवेचे कौतुक केले. एएफएमसीकडून मध्य-विभागीय, विभागीय रुग्णालयांमार्फत विविध मोहिमांमध्ये तैनात दलांना सर्वोत्कृष्ट सेवा पुरवण्यात येतात. 


एएफएमसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अनुप बॅनर्जी यांनी या वेळी बोलताना एएफएमसीने मोहिमांदरम्यान आणि शंततेच्या काळात मानवी मदत आणि आपत्ती निवारणासाठी सज्ज असले पाहिजे, यावर भर दिला. त्यांनी सर्वकाळात सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची एएफएमसीची कटीबद्धता व्यक्त केली. 


एएफएमसीच्या रुग्णालयांना चांगल्या सेवेसाठी आणि त्यांच्यामध्ये निकोप स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी संरक्षण मंत्री चषक 1989 पासून प्रदान करण्यात येतो. लेफ्टनंट जनरल किंवा समकक्ष पदावरील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती सर्वोत्कृष्ट रुग्णालयाची निवड करते. 


पारितोषक सोहळ्यासाठी संरक्षण सचिव डॉ अजय कुमार, इतर वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवरांची उपस्थिती होती. 


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image