उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण


पुणे : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पवार चॅरिटेबल ट्रस्ट मुबंई यांच्यावतीने देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. या रुग्‍णवाहिकांचा लाभ खडकवासला, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, भोर, कर्जत-जामखेड आणि पारनेर या भागातील नागरिकांसाठी होणार आहे.


विधानभवन प्रांगणात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, आमदार चेतन तुपे, निलेश लंके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.