शहीद जवान वामन मोहन पवार यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातल्या टाकळीचे शहीद जवान वामन मोहन पवार यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.


वामन पवार हे अठरा वर्षांपासून सैन्यदलात कार्यरत होते. ते जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय राज्यमार्ग नरसू इथं त्यांना हौतात्म्य आलं होतं. अंत्यसंस्काराच्या वेळी अहमदनगरमधल्या सैन्य दलाच्या तुकडीनं त्यांना शेवटची सलामी दिली.