इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग दिवाळीनंतर टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याची राज्य सरकारची तयारी


मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता 9 वी ते 12 वी या उच्च माध्यमिक विभागातले वर्ग दिवाळी नंतर टप्प्या टप्प्यानं सुरू केले जातील, या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर सविस्तर बोलणी झाली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल संध्याकाळी दिली.

इयत्ता 11 वी प्रवेशा संदर्भात त्या म्हणाल्या की जवळपास 18 लाख विद्यार्थी प्रवेशासाठी इच्छूक आहेत,पैकी 11 लाख विद्य़ार्थ्यांच्या ऑनलाईन आणि थेट प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, उर्वरीत 7 लाख विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबद्दल लवकरंच प्रक्रिया पूर्ण केली जाईल. प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू करण्याबाबत त्यानंतर विचार केला जाईल, असंही त्या म्हणाल्या.


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
पंतप्रधानांनी ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या भागातील भारतीय नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद
कॅटरिंग ब्रँड फीस्टलीचा मुंबईत प्रवेश
Image