विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. फडणवीस हे बिहार निवडणुकांच्या प्रचार दौऱ्यावर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली,अशी माहिती त्यांनी आपल्या ट्वीटर संदेशात दिली आहे.डॉक्टरांनी त्यांच्यावर त्वरीत औषधोपचार सुरू केले आहेत, असंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे.