देशातल्या कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७२ लाखांच्यावर


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सकाळी  ८ वाजता संपलेल्या २४ तासात, ३६ हजार ४६९ नव्या  कोरोनाबाधितांची  नोंद  झाली.  यामुळे देशभरातली एकूण कोरोना रुग्णसंख्या ७९ लाख ४६ हजारांवर गेली आहे. देशभरात आज सकाळपर्यंत सुमारे ६३ हजारांहून जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७२ लाखांच्यावर पोहोचली  आहे.
 
  देशातलं, कोरोनाबाधित बरे होण्याचं प्रमाण ९० पूर्णांक  ६२ शतांश  टक्क्यांच्या वर पोहोचलं आहे. या  चोवीस  तासात  देशात  ४८८  जण  कोरोनामुळे दगावले. यामुळे कोरोनाबळींची  एकूण  संख्या १  लाख १९ हजार ५०२  झाली आहे. सध्या देशातलं  कोरोनाबाधितांच्या  मृत्युचं  प्रमाण  दीड  टक्के इतकं आहे.  देशभरात सध्या ६ लाख २५ हजार कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.