जम्मूकाश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी राबवलेल्या शोधमोहिमेत मोठा शस्त्रसाठा जप्त


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मूकाश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील गंभीर मुघालन भागात सुरक्षा दलांनी राबवलेल्या शोधमोहिमेत मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

जम्मूकाश्मीर पोलीस दल आणि राष्ट्रीय रायफल्सच्या ३८व्या तुकडीन या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर इथे शोधमोहीम राबवली. यावेळी दोन एके-47 रायफल्स, २७० जिवंत काडतुसे, दोन चीनी बनवतीची पिस्तुले, आणि सहा किलो स्फोटके मिळाली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.