ट्रेडइंडिया.कॉमने डिजिटल सोल्युशन 'ट्रेडखाता' लॉन्च केले


लघु उद्योजक आणि व्यावसायिकांना सक्षम करण्याचा उद्देश


मुंबई : देशातील असंख्य लघु उद्योजक आणि व्यावसायिकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने ट्रेडइंडिया.कॉम या देशातील सर्वात मोठ्या बीटूबी बाजारपेठेने 'ट्रेडखाता' हे अत्याधुनिक डिजिटल सोल्यूशन सादर केले आहे. विषाणू प्रसाराच्या काळात मानवी कलेक्शनची समस्या दूर करत एसएमएसद्वारे नियमित फ्री रिमाइंडर्समार्फत या सोल्युशनद्वारे लघु उद्योजक त्यांचे व्यवहार करू शकतात. मोफत आणि वापरण्यास सोपे असलेले बिझनेस वृद्धींगत करणारे डिजिटल सोल्युशन ५.५ दशलक्ष लघु उद्योगांमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज आहे.


ट्रेडखाताने संपूर्ण डिजिटल बिलिंग सोल्युशन दिले असून ते इन्व्हॉइसिंग, पेमेंट कलेक्शन, बल्क पे आउट्स आणि कस्टमर डाटा मॅनेजमेंट स्वयंचलित करून व्यवसायातील ऑपरेशन्स सुसंगत करतात. व्यवसाय मालकांना हे वेगाने पेमेंट संकलित करण्यासाठी तसेच सर्वांमध्ये सहज समेट घडवण्यासाठी कार्यक्षम मार्गही प्रदान करते. याचे सर्वसमावेशक पेमेंट सोल्यूशन यूझर्सना यूपीआय, वॉलेट्स, क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग, अखंद वृद्धीच्या संधी देण्यास मदत करते.


ट्रेडइंडिया.कॉमचे संस्थापक आणि सीईओ बिक्की खोसला म्हणाले, ‘कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे हे वर्ष दुकान मालक, उद्योजक आणि व्यापा-यांसाठी मोठे चिंतादायक ठरले. ही स्थिती काहीशी संतुलित करण्यासाठी तसेच व्यवसाय वृद्धीतील अनेक अडथळे दूर करण्यासाठी ट्रेडइंडिया.कॉम हे कल्पक डिजिटल सोल्युशन देत आहे. याद्वारे देशभरातील व्यवयाय मालकांना तांत्रिकदृष्ट्या त्यांचा व्यापार वाढवण्याची तसेच नव्या व चपळ डिजिटल अर्थव्यवस्थेच्या निर्मितीत सहभागी होण्याची संधी दिली जात आहे. व्यवहाराची नोंदणी पद्धत अगदी सुलभ करण्यासाठी हे डिजिटल सोल्युशन तयार करण्यात आले आहे. तसेच लघु उद्योजकांची उत्पादकता यातून वाढते.'


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image