दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत मोफत वेबिनार


मुंबई : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अंतर्गत २१ दिव्यांगत्वाच्या प्रकारांबाबत माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत विविध वेबिनार आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार दि. १७ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता कर्णबधिर व ऐकायला येण्यास अवघड व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता  डॉ. संजय सोनावळे यांना आमंत्रित करण्यात आले आहे.


या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/CjGpCtUc-ak    या लिंकचा वापर करावा. तसेच यापुर्वी दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत आत्तापर्यंत घेण्यात आलेल्या वेबिनारचा लाभ घेण्याकरिता दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या यु टयूब चॅनल ला भेट द्यावी.


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image