सुप्रसिदध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या शुभहस्ते "काव्यातील नक्षत्र"चे प्रकाशन


पिंपरी : नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने दर महिन्याच्या ई मासिक "काव्यातील नक्षत्र" ऑक्टोबर २०२० चे ऑनलाईन प्रकाशन आयोजित केले आहे. सहाव्या अंकात मैत्री, नक्षत्र, रात्र, किनारा या विषयांवरील कवितांचा समावेश करण्यात आला आहे.


हे ई मासिक सर्वत्र विनामूल्य वितरण व प्रकाशन केले जाते. फक्त कवितांचा समावेश असलेले हे एकमेव ई मासिक आहे. केवळ कवींसाठी अहोरात्र काव्यमंच कार्य करत आहे. विनामूल्य कविता यात घेण्यात आल्या आहेत. सातत्यपुर्वक विविध उपक्रम राबविणारी हि संस्था आहे. यातुन काही निवडक कवितांची सुध्दा निवड जाणकार परीक्षकांकडून दर महिन्याला केली जाते.


यावेळी सुप्रसिदध उद्योजक कोहीनूर ग्रुप चेअरमन श्री. कृष्णकुमार गोयल यांच्या शुभहस्ते प्रकाशन सोहळा सांय ४ वा. ऑनलाईन संपन्न होत आहे. हा सोहळा १४ ऑक्टोबर २०२० रोजी अन्य मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक, पुस्तकप्रेमी अध्यक्ष अमर प्रतिष्ठानचे श्री. संदीप नाईक उपस्थित राहणार आहे. अशी माहिती संपादक कवी वादळकार यांनी कळविली आहे.