अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीची अंतिम लढत


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीची अंतिम लढत, जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिम यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज पहाटे पाच वाजता संपलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात अलेक्झांडर झ्वेरेव्ह यानं अटीतटीच्या झुंजीत, दोन सेट्सची पिछाडी भरून काढत, स्पेनच्या कॅरेनो बस्टा याला ३-६, २-६, ६-३, ६-४, ६-३ असं हरवलं.


आज सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात, तिसऱ्या स्थानावरील डॉमिनिक थिम यानं, पाचव्या स्थानावरील डॅनियल मेदवेदेव या रशियाच्या  टेनिसपटूला, ६-२, ७-६, ७-६ असं तीन तासांच्या झुंजीत नमवलं.



जपानची नाओमी ओसाका आणि बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेन्का  यांच्यात, भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री उशिरा ते उद्या पहाटे या वेळेत, महिला एकेरीची अंतिम फेरीची लढत रंगणार आहे.


Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image