अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांना जामीन देऊ नये - एनसीबी


मुंबई (वृत्तसंस्था) : अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक हे अंमली पदार्थांचे व्यवहार करणाऱ्या गटाचे सक्रीय सदस्य असल्यानं, या प्रकरणात त्यांना जामीन देऊ नये, अशी मागणी एनसीबी, अर्थात अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे.

याबाबतचं एक शपथपत्र एनसीबीनं न्यायालयात सादर केलं आहे. या दोघांनी अंमली पदार्थ व्यवहारांना उत्तेजन दिलं असून, पैसाही पुरवला असल्याचं, या शपथपत्रात म्हटलं आहे. रिया आणि शौविक या दोघांनाही या महिन्याच्या सुरुवातीला एनसीबीनं अटक केली होती, सध्या हे दोघं न्यायालयीन कोठडीत आहेत.