मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अध्यादेश आणण्यावर महाविकास आघाडी सरकार त्याकडे लक्ष देईल - बाळासाहेब थोरात


मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अध्यादेश आणणे हा कायदेशीर मुद्दा आहे आणि महाविकास आघाडी सरकार त्याकडे लक्ष देईल असं महाराष्ट्रातील प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्याच्या निर्णयानंतर अध्यादेशाचा मार्ग अवलंबण्याच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विरोधी पक्षांनं या विषयावर राजकारण करू नये आणि मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकारला पाठींबा द्यावा असंही थोरात यांनी म्हटलं आहे.