एंजल ब्रोकिंग लिमिटेडचा आयपीओ २२ सप्टेंबर २०२० रोजी खुला होणार


मुंबई : एनएसईवर जून २०२० पर्यंत सक्रिय ग्राहकांच्या बाबतीत एंजल ब्रोकिंग लिमिटेड (कंपनी) हे भारतातील सर्वात मोठे रिटेल ब्रोकिंग हाऊस आहे (स्रोत: क्रिसिल अहवाल). ही कंपनी २२ सप्टेंबर रोजी प्रत्येकी १० रुपये असे दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचे इनिशिअल पब्लिक ऑफर अर्थात आयपीओ (‘इक्विटी शेअर्स’ आणि इनिशिअल पब्लिक ऑफर- ‘ऑफर’) खुले करणार आहे. ही ऑफर २४ सप्टेंबर २०२० रोजी बंद होईल. ऑफरचा दरपट्टा ३०५ ते ३०६ रुपये प्रति समभाग असा निश्चित करण्यात आला आहे. या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये कंपनीच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.


या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये कंपनीच्या सरासरी ६,००००.०० दशलक्ष रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा समावेश असून त्यात सरासरी ३,०००.०० दशलक्ष रूपयांच्या नवीन समभागांचा (फ्रेश इश्यू) समावेश आहे आणि ऑफर फॉर सेल सरासरी ३,०००.०० रूपयांपर्यंत आहे. त्यात अशोक डी ठक्कर यांचे सरासरी १८३.३५ दशलक्ष आणि सुनिता मगनानी यांचे सरासरी ४५.०० दशलक्ष रूपयांपर्यंतच्या समभागंचा (प्रवर्तक विक्री भागधारक) आणि आयएफसीच्या १,२००.०२ दशलक्ष रूपयांपर्यंत (गुंतवणूक विक्री भागधारक) आणि वैयक्तिक विक्री भागधारकांचे १५७१.६३ रूपयांपर्यंत (प्रवर्तक विक्री भागधारक, गुंतवणूक विक्री भागधारक आणि वैयक्तिक विक्री भागधारक मिळून) यांचा समावेश आहे.


कमीत कमी ४९ इक्विटी शेअर्ससाठी बोली लावली जाऊ शकते. आणि त्यानंतर ४९ इक्विटी शेअर्सची मल्टिपल्समध्ये बोली लावली जाऊ शकते. या ऑफरमध्ये देण्यात येणा-या इक्विटी शेअर्सची यादी बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (एनएसई) या दोन्ही ठिकाणी असेल. ऑफरच्या उद्देशाने एनएसई हा नियोजित स्टॉक एक्सचेंज आहे.


आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, एडलविस फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्टेक्स लिमिटेड हे ऑफरसाठीचे (BRLMs) प्रमुख लीड मॅनेजर्स असतील.