कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने सोन्यासह कच्चे तेल आणि बेस मेटलचे दर घसरले


मुंबई : कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याने मागील आठवड्यात स्पॉट गोल्ड, कच्चे तेल, बेस मेटलचे दर घसरले. अमेरिकेच्या डॉलर मूल्यात सुधारणा झाल्याने सोन्याचे दर घसरले व कच्च्या तेलावरही याचा परिणाम झाला. यासोबतच अमेरिका आणि चीनदरम्यानच्या वाढत्या तणावामुळे औद्योगिक धातूंच्या किंमतीवर दबाव आला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.


सोने: अमेरिकी डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने स्पॉट गोल्डचे दर ४.२% नी घटले. अमेरिकी धोरणकर्त्यांकडून प्रोत्साहन मिळण्यासंबंधी अनिश्चितता असल्याने पिवळ्या धातूचे दर आणखी घसरले. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने पुढील काही वर्षांत वेगवान आर्थिक सुधारणा होण्याचे संकेत दिल्याने डॉलरला चांगलाच आधार मिळाला. यासोबतच, युरोप आणि ब्रिटनमध्ये कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत तीव्र वाढ झाल्याने डॉलरच्या वर्चस्वाखालील सोन्याला मागणी वाढली. अमेरिकी फेडरलच्या अतिरिक्त प्रोत्साहनामुळे तसेच राष्ट्राध्यक्ष निवडणूक चर्चेतील राजकीय अनिश्चिततेमुळे सोन्याच्या दरांना आणखी आधार मिळण्याची शक्यता आहे.


कच्चे तेल: साथीचा विस्तारणारा प्रभाव आणि अमेरिकी डॉलरमधील सुधारणा यामुळे डब्ल्यूटीआय क्रूडचे दर २ टक्क्यांनी घसरले. अनेक महिन्यांच्या लॉकडाऊननंतर लिबियाततील तेल उत्पादन पुन्हा सुरू झाल्याने कच्च्या तेलावर आणखी घसरणीची वेळ आहे. लिबियााच्या उत्पादनामुळे जागतिक क्रूड बाजारात लाखो बॅरलची दररोज भर पडेल, असा अंदाज आहे. अमेरिकेच्या एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या मते, अमेरिकी क्रूड साठ्ात २.३ दशलक्ष बॅरलची घट अपेक्षित असताना ती १.६ दशलक्ष बॅरल ए‌वढी घसरली. तेलसाठ्यातील घट, आर्थिक सुधारणेची धूसर शक्यता आणि कोव्हिड१९ च्या रुग्णांची नवी लाट यामुळे तेलाचे दर आणखी कोसळू शकतात.


बेस मेटल्स: कोव्हिड-१९च्या वाढत्या संसर्गामुळे एलएमईवरील बेस मेटलचे दर लाल रंगात स्थिरावले. अमेरिका-चीनमधील वाढता तणाव, अमेरिकन डॉलरची सुधारणा यामुळे औद्योगिक धातूच्या दरात आणखी घट झाली. ऑगस्ट २०२० मध्ये चीनच्या औद्योगिक कामकाजात आणि रिटेल विक्रीत वाढ झाली. चीन जगात धातूचा सर्वात मोठा ग्राहक असल्याने किंमतीतील घसरण मर्यादित राहिली. कस्टमच्या जनरल अॅडमिनिस्ट्रेशननुसार, चीनचे अॅल्यमिमिनिअम आणि अॅल्युमिनिअम उत्पादनातील आयात ऑगस्ट २०२० मध्ये १० टक्क्यांनी वाढली आणि ४,२९,४६४ टनांवर पोहोचली.


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image