राज्यातलं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून ७८.२६ टक्क्यावर


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १९ हजार २१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आतापर्यंत १० लाख ६९ हजार १५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज ७८.२६ टक्के नोंद झाली आहे. 

काल दिवसभरात आणखी १४ हजार ९७६ कोरोनाबाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १३ लाख ६६ हजार १२९ झाली आहे. राज्यभरात काल ४३० रुग्णांचा मृत्यू झाला.

या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ३६ हजार १८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २ लाख ६० हजार ३६३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.