सुशांतसिंह राजपुत मृत्यू प्रकरणात एका अंमली पदार्थ विक्रेत्याला अटक


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेता सुशांतसिंह राजपुत मृत्यू प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं एका अंमली पदार्थ विक्रेत्याला अटक केली आहे. जैद नावाचा हा इसम मुंबईत होणाऱ्या मोठमोठ्या पार्ट्यांसाठी अंमलीपदार्थ पुरवत असल्याचं समोर आलं आहे.


अंमली पदार्थांच्या खरेदीबाबत सुशांतसिंहची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या मोबाईलमधून मिळालेली माहिती अंमलबजावणी संचालनालयानं अंमली पदार्थ नियंत्रण विभागाला दिली होती, त्या माहितीवरून या विभागानं मुंबईतून दोन जणांना अटक केली होती, त्याच्या चौकशीनंतर आजची ही कारवाई करण्यात आली.


या तिघांशिवाय महाराष्ट्र, दिल्ली आणि गोव्यातल्या अंमली पदार्थांच्या काही व्यापाऱ्यांचा शोध सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.