राज्यात आजपासून रेडीरेकनरचे नवे दर लागू


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आजपासून रेडीरेकनरचे नवे दर लागू होत आहेत. रेडीरेकनरच्या दरात महानगरपालिका क्षेत्रात सरासरी एक पूर्णांक दोन दशांश टक्के, तर ग्रामीण क्षेत्रात दोन पूर्णांक ८१ शतांश टक्के वाढ करण्यात आली आहे.

राज्याचे नोंदणी महानिरिक्षक ओमप्रकाश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुंबईत रेडीरेकनरच्या दरात दर शून्य पूर्णांक सहा दशांश टक्के, तर पुण्यात सर्वाधिक तीन पूर्णांक ९९ शतांश टक्के वाढ झाली आहे. महानगरपालिका क्षेत्रात रेडीरेकनरच्या दरात शून्य पूर्णांक ५१ टक्के, तर ग्रामीण भागात एक पूर्णांक २६ टक्के इतकी वाढ झाली आहे.