माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं निधन


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं आज निधन झालं. कोरोनातून बरे झाल्यानंतर, तब्येत बिघडल्यानं त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल भंगत सिंह कोश्यारी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रघुवंश यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.