भारताच्या पहिल्या आरआरटीएस रेल्वेची पहिली झलक


नवी दिल्‍ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या आत्मनिर्भर भारत अभियानात पायाभूत सुविधा हा एक महत्वाचा स्तंभ आहे. हाय स्पीड,हाय फ्रिक्वेन्सी असलेली ही आरआरटीएस प्रवासी रेल्वेची संपूर्ण निर्मिती,केंद्र सरकारच्या 'मेक  इन इंडिया' अभियानाअंतर्गत करण्यात येत आहे. या गाडीची पहिली झलक राष्ट्रीय राजधानी वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष दुर्गा शंकर मिश्रा यांनी आज  दर्शवली.  


पर्यावरण स्नेही,उर्जा बचत करणाऱ्या या गाडीमुळे एनसीआर आणि आजूबाजूच्या प्रदेशातल्या जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 


या रेल्वेमुळे आर्थिक संधी निर्माण होऊन त्यातून विकासाला चालना मिळेल आणि वायू प्रदूषणही कमी होईल, कार्बन उत्सर्जन, वाहतूक कोंडी आणि अपघात कमी होण्यासाठीही मदत होणार असल्याचे ते म्हणाले. अशा प्रकारची ही भारतातली पहिली रेल्वे असून तिचा वेग ताशी 180 किमी असून, बाहेरून चमकदार स्टेनलेस स्टीलची रेल्वे असून ती वजनाने हलकी आणि संपूर्णपणे वातानुकुलीत असेल. चढण्या - उतरण्यासाठी सोयीच्या असणाऱ्या  या रेल्वेत 2x2 आसन व्यवस्था तसेच आरामदायी प्रवासासाठी पाय ठेण्यासाठी पुरेशी जागा राहील.समान ठेण्यासाठी जागा, लॅपटोप, मोबाईल चार्जिंग साठी सोय, वाय- फाय सुविधा राहणार आहे. नवी दिल्लीच्या लोटस टेम्पलच्या धर्तीवर या गाडीत प्रकाश आणि हवेची सोय करण्यात आली असून  भारतीय  संस्कृती आणि आधुनिक  तंत्रज्ञानाचा संगम यात साधण्यात आला आहे. 


प्रादेशिक रेल्वे सेवेसाठी एनसीआरटीसी 30 गाड्या खरेदी करणार आहे. 


दिल्ली- गाझियाबाद-मेरठ आरआरटीएस कॉरीडॉर पहिल्या टप्यात अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या  पहिल्या तीन  कॉरीडॉरपैकी एक आहे. 82 किमीचा हा कॉरीडॉर भारतात अंमलबजावणी करण्यात येणारा पहिलाआरआरटीएस कॉरीडॉर आहे.


अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा : www.ncrtc.in


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image