नक्षली कारवायांमुळे होणाऱ्या हिंसाचारांत घट


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नक्षली कारवायांमुळे होणाऱ्या हिंसाचारांत तसंच देशातील त्यांच्या भौगोलिक प्रसारात घट झाल्याचं गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी काल संसदेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरांत दिली.

अशा हल्ल्यामुळे २०१९ मध्ये १३७ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या तुलनेत गेल्या महिन्याच्या १५ तारखेपर्यंत १०२ नागरिकांच्या मृत्यूची नोंद झाली.

केंद्र सरकारनं २०१५ मध्ये राबविलेल्या राष्ट्रीय धोरण आणि कृती योजनेमुळे अशा प्रकारच्या विचारसरणीला आळा घालण्यास मदत झाल्याचंही त्यांनी सागिंतलं.