अंतिम वर्षाच्या परीक्षासंदर्भात तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांची घेतली भेट
• महेश आनंदा लोंढे
श्री. सामंत म्हणाले, उद्या दुपारी ४:०० वाजता राज्यपाल महोदय यांच्या सोबत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या उपस्थितीत होईल आणि समितीचा अहवाल सादर करण्यात येईल. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत परीक्षा घेण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवून राज्यातील कोविड-१९ची सद्यस्थितीत आणि परीक्षेसंदर्भातील नियोजन कळविण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.