मुंबईतल्या टपाल कार्यालय, कर्मचारी वसाहतींची दुरुस्तीसाठी निधीची मागणी


मुंबई : मुंबईतल्या टपाल कार्यालय, कर्मचारी वसाहतींची दुरुस्ती आणि कार्यालयाच्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी करणारं निवेदन खासदार गजानन कीर्तिकर यांनी केंद्रीय टपाल सचिव प्रदिप्ताक कुमार बीसोई यांना काल नवी दिल्ली इथं दिलं.

बीसोई यांनी याविषयी सकारात्मक भूमिका घेत जास्तीवत जास्ती निधी उपलब्ध  करून देण्याचं आश्वायसन दिल्याचं किर्तीकर यांनी सांगितलं. 


मुंबईतील मुख्य टपाल कार्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती करणं अत्यंबत गरजेचं असून त्यासाठी आठ कोटी रुपयांच्या निधीची मागणी कीर्तिकर यांनी केली आहे.