केंद्रीय संरक्षण दलातल्या 36 हजार जवांनांना कोरोनाची लागण


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारितल्या 7 संरक्षण दलातल्या 36 हजार जवांनांना कोरोनाची लागण झाली आहे, असं पीटीआय या वृत्त संस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगीक सुरक्षा दल, इंडो तिबेटीयन सीमा पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा दल, सशस्त्र सीमा बल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातल्या जवानांचा यात समावेश आहे.


आतापर्यंत 128 जवानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 6 हजार 646 जवान उपचार घेत आहेत, तर उर्वरीत जवान बरे झाले आहेत.