ईईएसएल टाटा मोटर्स लिमिटेड आणि ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडकडून 250 इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणार


टाटा मोटर्स लिमिटेड 150 नेक्सन एक्सझेड + इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि ह्युंदाई मोटर इंडिया लि.कोना इलेक्ट्रिक प्रीमियम एसयूव्हीच्या 100 युनिट्सचा पुरवठा करणार


इलेक्ट्रिक वाहने केंद्र आणि राज्य सरकारच्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या विद्यमान ताफ्यांची जागा घेतील


नवी दिल्ली : केंद्र  सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणात असलेली एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) ही एक उत्तम ऊर्जा सेवा कंपनी (ईएससीओ) टाटा मोटर्स आणि ह्युंदाई मोटर इंडियाकडून 250 इलेक्ट्रिक वाहने खरेदी करेल. आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक बोली  प्रक्रियेद्वारे कंपन्यांची निवड करण्यात आली, ज्याचा उद्देश सहभाग वाढवणे हा  होता. टाटा मोटर्स लिमिटेड आणि ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने निविदा जिंकली आणि आता सरकारी वापरासाठी अनुक्रमे 150 नेक्सन इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि 100 कोना इलेक्ट्रिक प्रीमियम एसयूव्ही पुरवतील. टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक  गुएंटर बुशेक,  टाटा मोटर्स प्रवासी वाहन उद्योग युनिटचे अध्यक्ष  शैलेश चंद्र, आणि ह्युंदाई मोटर इंडिया लि चे  विक्री, विपणन आणि सेवा संचालक तरुण गर्ग यांच्या उपस्थितीत खरेदीसाठी लेटर ऑफ अवॉर्ड या दोन  कंपन्यांना देण्यात आले.


एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) नुकत्याच दिलेल्या अनुदानातून या खरेदीसाठी  5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स वापरले जाणार आहेत.  वाढता खर्च आणि डिमांड साइड एनर्जी एफिशियन्सी सेक्टर प्रोजेक्ट्स यासारख्या उच्च प्राधान्य असलेल्या क्षेत्रांना वित्तपुरवठा करण्यासाठी ईईएसएलला एडीबीकडून अर्थसहाय्य मिळाले होते.


ईईएसएलचे कार्यकारी उपाध्यक्ष  सौरभ कुमार म्हणाले, “आमच्या ई-मोबिलिटी कार्यक्रमाद्वारे इलेक्ट्रिक वाहनांकडे वळल्यामुळे  तेल आयातीवरील अवलंबत्व कमी होईल आणि भारतातील वीज क्षमता वाढीला चालना मिळेल. यामुळे देशाच्या ऊर्जा सुरक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि परिवहन क्षेत्रामधून जीएचजी उत्सर्जन कमी होईल. शिवाय, आम्ही ईव्ही चार्जिंग स्टेशनची जलद  स्थापना करण्यावरही काम करत आहोत, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहन विक्रीला चालना मिळेल.  ”


ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे व्यस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  सीओन सीओब किम म्हणाले की, “मानवतेसाठी प्रगती” या दृष्टीकोनाला अनुसरून  आम्ही पर्यावरणाला  अनुकूल आणि मानवकेंद्री  तंत्रज्ञान विकसित करत आहोत जे आमच्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट अनुभव  देतात. एक काळजीवाहू आणि जबाबदार ब्रॅण्ड म्हणून, स्वच्छ ऊर्जेच्या  सरकारच्या उद्दीष्टाला  अनुसरून इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी शाश्वत परिसंस्था तयार करण्यासाठी सर्व हितधारकांसह सहकार्य करणे  हे  आमचे सौभाग्य आहे,  स्वच्छ आणि हरित वातावरणाच्या दिशेने  योगदान देणार्‍या भारतीय बाजारासाठी ह्युंदाई जागतिक स्तरावरील पर्यावरणपूरक उत्पादने आणि तंत्रज्ञान यापुढेही आणत राहील . "


टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन उद्योग  युनिटचे अध्यक्ष  शैलेश चंद्र म्हणाले, “इलेक्ट्रिक मोबिलिटीला  देशात चालना मिळत  आहे आणि अशा प्रकारची भागीदारी आवश्यक गती वाढविण्यासाठी निर्णायक आहेत. आम्ही ईईएसएलबरोबर  भागीदारी करत आहोत आणि भविष्यात मोबिलिटी  सोल्यूशनमध्ये एक सुरळीत आणि शाश्वत संक्रमण सक्षम करून, सरकारी वापरासाठी त्यांना अधिक ईव्ही प्रदान केल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. वेगाने वाढणार्‍या ईव्ही सेगमेंटचे आघाडीचे उत्पादक  म्हणून टाटा मोटर्स संपूर्ण भारतात त्यांची सहज उपलब्धता आणि वापर लोकप्रिय करण्यासाठी  वचनबद्ध आहेत. ”


आर्थिक विकास आणि पर्यावरणीय शाश्वततेचे संतुलन साधताना, विध्वंसक तंत्रज्ञानाच्या उपायांचा वेगवान अवलंब करण्याच्या उद्देशाने ईईएसएल प्रेरित आहे.  या विशिष्ट पुढाकाराने, ईईएसएल वाढती मागणी आणि घाऊक खरेदीच्या  आपल्या विशिष्ट मॉडेलद्वारे इलेक्ट्रिक वाहनांसाठी बाजारपेठ तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. ईईएसएल प्रारंभिक मागणी वाढवण्यासाठी  सरकारी विभागांमधील विद्यमान वाहने बदलण्याची अपार क्षमता वापरण्याचा प्रयत्न करत आहे.


ईईएसएल  प्रत्येकी 14.86 लाख रुपये दराने टाटा नेक्सनची खरेदी करेल, रुपयांच्या तुलनेत 14.99 लाख किंमतीच्या एक्स शोरूमपेक्षा  13,000 इतकी  स्वस्त आहे , तर उच्च श्रेणी देणारी ह्युंदाई कोना  11% टक्के कमी किंमतीसह  21.36 लाख रुपये दराने तीन वर्षांच्या प्रमाणित हमीसह खरेदी केली जाईल. ही इलेक्ट्रिक वाहने केंद्र व राज्य सरकारच्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या विद्यमान ताफ्यांची जागा घेतील. ईईएसएलला यापूर्वी अपारंपारिक ऊर्जा आणि ग्रामीण तंत्रज्ञान (एएनईआरटी) संस्था, केरळ कडून सुरुवातीच्या टप्प्यात पुरवठा करण्यासाठी 300 लाँग रेंज ईव्हीसाठी ऑर्डर मिळाली आहे.


स्थानिक उत्पादन सुविधांना आधार देताना, ईव्ही उद्योगाच्या दीर्घकालीन विकासासाठी तांत्रिक कौशल्य मिळवणे  आणि भारतीय ईव्ही उत्पादकांना जागतिक पातळीवरील प्रमुख कंपनी म्हणून उदयास येण्यास सक्षम बनवताना ईईएसएलने आपल्या अभिनव व्यवसाय मॉडेलच्या माध्यमातून  क्षमता वाढवण्याची आणि खर्च कमी करण्याची योजना आखली आहे.


Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image