पुणे शहर भाजपाने वाढीव वीज बिलांचा हार ऊर्जा मंत्र्यांना पाठवला!


पुणे : पुणे येथील रास्ता पेठेतील महावितरण कार्यालयासमोर दिनांक ४ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी, वाढीव वीज बिल बाबत महाराष्ट्र राज्य सरकार विरोधात भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष मा. जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.


१. सदर वाढीव वीज बिले रद्द करण्यात यावीत.
२. सरासरी बिले जी महावितरणने पाठवलेली आहेत तीही रद्द करण्यात यावीत.
३. तसेच सक्तीची वसुली जी महावितरणने चालू केली आहे तीही त्वरित थांबविण्यात यावी.
४. याच बरोबर आम्ही आपणासमोर मागणी करत आहोत की ३०० युनिटपर्यंतचे विज बिल सरसकट माफ करण्यात यावे.


या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. महावितरणचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री बुंदिले यांना वरील मागण्यांचे सविस्तर निवेदन देण्यात आले.


पुणेकर नागरिकांच्यावतीने वाढीव वीज बिलांचा हार ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पोचविण्यासाठी महावितरण एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर श्री. बुंदिले यांच्याकडे देण्यात आला. पुणेकर नागरिकांच्या वरील मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास प्रखर जन-आंदोलनाचा इशारा अध्यक्ष मा. जगदीश मुळीक यांनी यावेळी दिला.


तसेच ह्या कोरोना संकटाच्या काळात सर्व नागरिक प्रचंड अडचणीत असताना, महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारची कोणतीही अत्यंत अन्यायकारक कारवाई करू नये असेही श्री जगदीश मुळीक यांनी सांगितले.


यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, गणेश बिडकर, शहर सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सर्व मंडलांचे अध्यक्ष नगरसेवक, पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.