महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना प्रलंबित महागाई भत्ता द्यायला मंजुरी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातल्या कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रलंबित महागाई भत्त्याची रक्कम द्यायला प्राधिकारणानं मान्यता दिली आहे.


प्राधिकरणाच्या काल झालेल्या बैठकीत यासाठी मान्यता दिल्याची माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. या निर्णयानुसार प्राधिकरणातल्या सुमारे ११ हजार ५७० कर्मचाऱ्यांना १ जुलै २०१४ ते २२ मार्च २०१४ या  कालावधीतली थकबाकी दिली जाईल. यासाठी सुमारे ६१ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी लागणार आहे.